नांदुरा प्रतिनिधी- महाराष्ट्रमध्ये ४,५,वर्षापासून दुष्काळ परिस्थिती असल्याने शेतकरी चिंतेत आहे शेतकऱ्यांना मालाला हमीभाव नाही विदर्भामध्ये दोन ते तीन वर्षापासून अतिवृष्टी होत आहे आलेली पिक वाया जात आहे जगाचा पोशिंदा उपासमारीची पाळी आली आहे तरी सन 2023 पर्यंत कर्जमाफी करून ७/१२ कोरा करण्याकरिता चांदूर बिस्वा येथील अंबिका फाउंडेशनचे अध्यक्ष अभय संतोषराव पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसीलदार नादुरा यांना दि.१ ऑगस्ट रोजी निवेदन दिले. निवेदनात नमूद आहे की . सन 2023 पर्यंत कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्यात यावा, शेतकरी रेशन धारकाच्या तुटी दूर करू अनुदान शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करावे ,पंतप्रधान सन्माननिधी तुटी दूर करून हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे, राज्य शासनाने जाहीर केलेले भावफलक सोयाबीन कापूस शेतकऱ्यांना हेक्टरी ५००० रु. अनुदान खात्यामध्ये जमा करण्यात यावे , शेतकऱ्यांच्या मागण्यांना न पूर्ण झाल्यास १५ दिवसानी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे म्हटले आहे अभय पाटील यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी स्वप्निल गव्हाड, शुभम सुभाष वानखडे, ननिर खान , प्रभाकर डोके, शेख निसार शेख इम्रान,म.अलीम म.सलीम यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.