आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नातून भागली पाच गावांची तहान

SHARE

१६ कोटी ५० लक्ष रुपये किमतीच्या पाच गाव पाणीपुरवठा योजनेचे झाले लोकार्पण

बुलढाणा : आपल्या अभूतपूर्व विकास कार्याने नावलौकिक प्राप्त केलेले आमदार संजय गायकवाड यांनी गेल्या अडीच वर्षात हजारो कोटी रुपयांची विकासकामे मतदार संघात खेचून आणली. यामध्ये एक महत्त्वाचे कार्य आज पूर्ण झाले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेल्या ७५ वर्षात ज्या पाच गावांना पेयजल व्यवस्था उपलब्ध नव्हती अशा गावांना १६ कोटी ५० लक्ष रुपये खर्च करून आ. संजूभाऊ गायकवाड यांनी पाणीपुरवठा योजना शासनाकडून मंजूर करवून घेतली. या योजनेचे लोकार्पण आज दि. १२ ऑगस्ट रोजी संजय गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले
बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील पाडळी, इजलापूर, गोंदणखेड, मेहेरखेड व पळसखेड नागो या गावांमध्ये स्वातंत्र्योत्तर काळापासून म्हणजे गेल्या ७५ वर्षांपासून कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्यवस्था नसल्यामुळे येथील गावकऱ्यांचे अतोनात हाल होत असत. पेयजलाच्या मूलभूत सुविधेपासून वंचित असलेल्या या पाच गावांमधील गावकऱ्यांची ही व्यथा संवेदनशील आमदार संजय गायकवाड यांनी जाणून घेतली व तात्काळ या समस्येचे निवारण करण्यासाठी राज्य शासनाकडे पाच गाव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता देत १६ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी देखील मंजूर केला. या योजनेचे काम पूर्ण होऊन दि. १२ ऑगस्ट रोजी संजय गायकवाड यांच्या हस्ते सदर पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण झाले. आ. संजूभाऊ गायकवाड यांच्या तत्परतेमुळे या गावांमधील महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरला असून गावातील अबाल वृद्धांची पाण्यासाठीची भटकंती देखील आता थांबणार आहे. संजय गायकवाड यांनी आपली सर्वात महत्त्वाची मागणी पूर्ण केल्याबद्दल सदर पाच गावांमधील ग्रामस्थ संजय गायकवाड यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहेत.


SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button