मोताळा :आज सकाळी 11 दरम्यान मलकापूर डेपो ची गाडी एम एच 06 – 3561 मलकापूर संभाजीनगर साठी तेहतीस प्रवासी घेऊन निघाली होती. मोताळा जवळील परडा फाट्याजवळील वळणावर ट्र्क बसवर आल्यामुळे प्रवाशांना वाचविण्याच्या प्रयत्नामध्ये शिवशाही रस्त्याच्या कडेला कोसळली. दरम्यान चिखल असल्यामुळे ब्रेकही लागले नाही. कडेला मोठे झाड असल्यामुळे प्रवासी सुखरूप वाचले. घटनेची माहिती मिळताच आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे यांनी घटनास्थळाला भेट दिली.
वाहक आर आर करंगळे यांनाही किरकोळ इजा झाली.
पोलीस,परिसरातील नागरिक तथा आझाद हिंद च्या कार्यकर्त्यांनी वेळेवर मदत कार्य केल्यामुळे जीवित हानी टळली. प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. चालक एस एन बोर्डे व वाहक आर आर करंगले सदर शिवशाही बसवर सेवेत कार्यरत होते.
किरकोळ दुखापत झालेल्या जखमी प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा या ठिकाणी उपचारार्थ भरती केले आहे.