बुलडाणा : समता संघटना (आंबेडकराईट) चे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ गवई यांचे नेतृत्वात भूमिहीनांच्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा समोर निदर्शने करण्यात आली.
जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने अजूनही वन हक्काचे पट्टे वाटप केले नाही तसेच गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप न करता त्यावर सौर ऊर्जेच्या प्रकल्पास मान्यता देत आहेत याला विरोध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. येत्या पंधरा दिवसात भूमिहीनांच्या प्रलंबीत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा यावेळी देण्यात आला. यावेळी प्रदेशअध्यक्ष गजानन जाधव, विभाग अध्यक्ष विनोद इंगळे, जिल्हाध्यक्ष विजय दोडे, तालुका अध्यक्ष विजय बावस्कर, समाधान अवचार, भारत भाई पैठने, रफिक शा, रमेश इंगळे यांचेसह असंख्य अतिक्रमण धारक उपस्थित होते.