मोताळा : शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे या 14 वर्षीय शाळकरी मुलाची शिकवणी ला जात असताना शेगांव येथून अपहरण करून अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली.सदर घटना ही समाजामध्ये मन सुन्न करणारी असून.समाजामध्ये अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक असून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी निष्पाप बालक कृष्णा कराळे च्या हत्ये प्रकरणी जलद न्यायालय कडून चौकशी होऊन हत्येमध्ये सामील असलेल्या नराधमांना ,फाशीची शिक्षा व्हावी.या साठी आज मराठा पाटील युवक समिती मोताळा तालुक्याच्या वतीने मोताळा तहसील यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी मोताळा तालुका मराठा पाटील युवक समिती सर्व सदस्य मोठा संख्येने उपस्तित होते