मोताळा : मराठा पाटील युवक समितीच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन गेल्या काही वर्षा पासून ग्रामीण भागात करत आहे. मोताळा तालुक्यातील वरुड येथे दिनांक 4 ऑगस्ट रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराची सुरुवात युवक समितीचे संस्थापक अध्यक्ष गजानन भाऊ ढगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आली.यावेळी नेत्र चिकित्सक डॉक्टर शरद पाटील यांनी नागरिकांना डोळ्यांची घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे यांनी मराठा पाटील युवक समितीच्या कार्याची माहिती देत नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. सूत्रसंचालन मंगेश सातव सर यांनी केले. शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला या शिबिरामध्ये 165 जणांची तपासणी तसेच काहींना अल्प दरात चष्मे सुद्धा देण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थितीत संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील ,डॉ .शरद पाटील, मोताळा येथील ज्येष्ठ तुळशीराम काका मापारी,जिल्हा कार्याध्यक्ष मोहन घुईकर, खामगाव तालुका अध्यक्ष राम पारस्कर, मोताळा तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण बांगर, माजी तालुकाध्यक्ष मारुती कोल्हे, चंद्रकांत शिराळ, मंगेश सातव, निवृत्ती दिवाने, यांची उपस्थिती होती. यावेळी, मराठा पाटील युवक समिती विद्यार्थी समिती मोताळा अध्यक्ष पवन जुनारे पाटील , व उपाध्यक्ष सुरज शिंगोटे पाटील, ज्ञानेश्वर (संताजी) पाटील, तानाजी पाटील, विजय पाटील, जगन्नाथ पाटील, विठ्ठल गायकी, मोहन पाटील, सुभाष कुटे, विलास पाटील, अर्जुन पाटील, श्रीकृष्ण घनोकार, राहुल घनोकार, अकशय घनोकार, अभी जुनारे वैभव संबारे, सर्व मराठा पाटील युवक समिती शाखा वरुड सदस्य उपस्तित होते