दि.४ – उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने मागील २३ सप्टेबर पासून संपूर्ण राज्यात आंदोलन सुरु असून दि.३ ऑक्टोबर पासून राज्यभरात बेमुदत कामबंद आंदोलन सुरु आहे. ८४ लक्ष ग्रामीन कुटुंबांच्या भल्यासाठी शासन दरबारी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे ग्रामविकास विभागांतर्गत स्वतंत्र विभाग करून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र आस्थापनेला मान्यता देऊन त्यांना शासनाच्या समकक्ष पदाचा दर्जा देऊन शासन सेवेत समाविष्ट करावे तसेच सर्व समुदाय संसाधन व्यक्ती यांना गावस्तरावर काम करणाऱ्या कॅडरला शासकीय दर्जा द्यावा ही एकमेव मागणी करण्यात आलेली आहे. यामागणीच्या अनुषंगाने सर्व राज्यभर तालुका स्तरावर उमेद संघटनेच्या वतीने महाअधिवेशन तथा उमेद संघटना मागणी जनजागृती महामेळावा आयोजित करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील तब्बल १० ते १५ हजार महिलांचा व कंत्राटी कर्मचारी यांचा सहभाग होता.
प्रसंगी कार्यक्रमाला मनिनिय खाजदार संजय भाऊ उत्तमराव देशमुख तसेच गाव स्तरावरील स्वयंसहायता समूहातील अध्यक्ष उपाध्यक्ष ग्रामसंघ व प्रभाग संघातील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक प्रभावी अमलबजावणी करणे होत असलेली लोककल्याणकारी योजना म्हणून उमेद अभियानाची ओळख आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तब्बल ८४ लाख कुटुंब संघटीत झाले असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न योजनेच्या माध्यमातून सोडवत आहेत. केंद्र सरकारचे लखपती दीदी धोरणाची अंमलबजावणी देखील राज्यात उमेद अभियानाच्या माध्यमातूनच सुरु आहे. त्यामुळे उमेद अभियानाला स्वतंत्र विभाग म्हणून घोषित केल्यास ग्रामीण महिलांचा सर्वांगिक विकासाचे ध्येय धोरणे यामाध्यमातून राबविता येतील आणि त्यांचा विकास हा शास्वत व चिरकाल पद्धतीने करता येईल.
आज दि.४ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यभर सर्व तालुक्यांमध्ये तालुका स्तरीय अधिवेशन बोलाविण्यात आले होते. त्यानुसार संघटनेच्या मागणीबाबत चर्चा करून दि.६ ऑक्टोबर २४ रोजी राज्यस्तरीय अधिवेशनाची तयारी करण्यात आली. राज्य स्तरीय महा अधिवेशनात राज्यातून तब्बल ३ लाख महिला व कर्मचाऱ्यांचा प्रत्येक्ष सहभाग असणार आहे. तसेच राज्यातील प्रत्येक गावात आभासी पद्धतीने ८० लाख महिला सहभागी होणार आहेत.
तालुका स्तरावर झालेल्या या अधिवेशनात मागणीच्या अनुषंगाने उपस्थित खासदार श्री. संजय उत्तमराव देशमुख यांनी आपली मागणी रास्त आणि योग्य असल्याचे सर्व उपस्थित मान्यवर यांनी सांगितले आणि शासन दरबारी आपल्या मागणी संदर्भात चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.विरोधी पक्षातील लोकप्रिनिधींनीही आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करूनही या सरकारने उमेद संघटनेची मागणी पूर्ण न केल्यास आम्ही आमच्या पक्षाच्या आणि आघाडीच्या अजेंडा मध्ये हा विषय प्राधान्याने घेऊन आम्ही सत्तेत आल्यावर उमेद संघटनेच्या मागणी पूर्ण करण्यासाठीचा निर्णय पहिल्यांदा लावू असे आश्वासन दिले.