बुलडाणा : बुलढाणा जिल्ह्यातील जनतेला दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी आणि दरवर्षी किमान 100 नवीन डॉक्टर्स तयार व्हावेत या उद्देशाने मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले आहेत..कार्यक्रमाला राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव देखील यांची देखील ऑनलाइन उपस्थित होते.. जिल्हा स्त्री रुग्णालय, क्षयरोग रुग्णालय परिसर धाड रोड बुलडाणा येथे हा कार्यक्रम पार पडला..यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कैलास झिने यांनी सांगितले की, 12 ऑक्टोंबर पासून एमबीबीएसच्या ऍडमिशन सुरू होत असून महाविद्यालयामध्ये आवश्यक त्या सोयी सुविधा जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये करण्यात आले आहे.. लेक्चर हॉल, लायब्ररी, लॅबोरेटरी, प्रशासकीय विभाग यांची पूर्तता करण्यात आली असून विद्यार्थ्यांकरिता होस्टेलची सुविधा देखील करण्यात आल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कैलास झिने यांनी दिली आहे.