जयश्री शेळके यांनी केली नुकसानग्रस्त शेतांची पाहणी
मोताळा तालुक्यात काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून तातडीने आर्थिक मदत जाहिर करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या सचिव ॲड.जयश्री शेळके यांनी मा.तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
मोताळा तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी विहिरी खचून गेल्या गेल्या असून तालुकाभरात मोठ्या प्रमाणात शेतीचे व घरांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात कपाशी, सोयाबिन, मका, कापुस, भाजीपाला या पिकांची विपुल प्रमाणात लागवड केली जाते. मागील महिन्यात देखील मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने या सर्व पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परंतु शेतकऱ्यांना शासनाकडून नेहमीप्रमाणे केराची टोपली दाखवली गेली. आताही शेतमालाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला आहे.
वाढलेली महागाई, निसर्गाचा प्रकोप, शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी आधीच त्रस्त आहेत. शेतीची मशागत, पेरणी, खत-बियाणे तसेच अनेक वेळा दुबार पेरणी करावी लागते यातच शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. आता मुसळधार पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतमालाच्या नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे अत्यावश्यक आहे.
यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्री शेळके यांनी मोताळा तालुक्यातील काही नुकसानग्रस्त ठिकाणी पाहणी केली. तसेच मा.तहसीलदार (मोताळा) यांच्याशी चर्चा करुन तातडीने सर्व्हे करावा आणि ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांना तातडीने मदत करण्यासंदर्भात विनंती केली