शिवसेना उबाठा कडून डॅा.मधुसुदन सावळे आघाडीवर

SHARE

गेल्या अनेक वर्षाची प्रतिक्षा होणार पूर्ण…? 

मोताळा- लोकसभेनंतर राज्यामध्ये विधानसभेचे पडघम वाजु लागले त्यासाठी अनेक नेते आप आपल्या परीने मोर्चे बांधनी करत आहे असे असतांना पण त्यामध्ये डॅा.मधुसुदन सावळे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे बुलढाणा विधानसभेचे सांभाव्य उमेदवार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात दिसून येत आहे.त्याचे कारण ही तसेच आहे डॅा.सावळे हे गेल्या अनेक दशकांपासुन शिवसेनेशी एकनिष्ठ आहे तिन वेळा तिकीट मागुनही मिळालं नाही तरी ते कुठलाही बंड न करता शिवसेनेने दिलेल्या उमेदवारासाठी प्रामाणिक पणे त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा घाटावर घाटाखाली दांडगा संपर्क आहे.शांत संयमी सुसंस्कृत, सुशिक्षीत माणूस म्हणून त्यांची मतदार संघावर एक वेगळी छाप आहे. बुलढाणा विधान सभेत जातीपातीचा विचार केला तर बहुतांश समाज मराठा असल्या मुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मराठा चेहऱ्याला पहिली पसंती देतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगतांना पहायला मिळत आहे.त्यातच डॅा.सावळे यांचा जनसंपर्क दांडगा असतांना भेटीघाटी झपाट्याने वाढल्या आहे.गेल्या अनेक दिवसापासून ते पायाला भिंगरी लावून मतदार संघात फिरत आहे.त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला योग्य उमेदवार डॅा.मधुसुदन सावळे असतील अशी आशा सर्व सामान्य नागरिकामध्ये दिसत आहे. डॅा.सावळे यांचे असलेले महाविकास आघाडीतील समंध त्यांची जमेची बाजू त्यांचा पेशा वैद्यकीय असल्यामुळे त्यांचे समंध अराजकीय आहे त्यातच महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना चालणारा चेहरा म्हणून डॅा.सावळे यांच्या नावाला सर्वश्रुत पसंती आहे.


SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button