मोताळा : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या वीज वितरण कंपनीच्या संदर्भामध्ये असलेल्या तक्रारी चा आढावा घेण्यासाठी व त्याचे निरसन करण्यासाठी दिनांक 14ऑक्टोंबर रोजी जनता दरबाराचे आयोजन करून सर्वांच्या समस्या व त्या सोडवण्याचे तातडीने आदेश दिले विधानसभेच्या निवडणुका या केव्हाही जाहीर होऊन आचारसंहिता लागू शकते, त्यामुळे कामाची लगबग सुरू आहे असे असताना सुद्धा आमदार संजय गायकवाड यांनी सर्वसामान्य जनता व शेतकरी यांच्या वीज वितरण कंपनी संदर्भात असलेल्या तक्रारी चे निरसन करण्याकरता जनता दरबाराचे आयोजन केले होते, याप्रसंगी बहुसंख्य शेतकऱ्यांनी आपल्या डी पी संदर्भातील समस्या, विद्युत पोलसंबंधीच्या समस्या धर्मवीर आमदार संजू भाऊ गायकवाड यांच्या लक्षामध्ये लेखी निवेदनाद्वारे आणून दिल्या, वितरण कंपनी संदर्भामध्ये काही नागरिकांच्या सुद्धा समस्या होत्या त्या सुद्धा नागरिकांनी लेखी निवेदनाद्वारे मांडल्या, आमदार संजय गायकवाड यांनी तातडीने अधिकाऱ्यांना या समस्यांची दखल घेऊन त्या त्वरित सोडविण्याचे आदेश दिले, काही महिन्यापूर्वी धर्मवीर आमदार संजू भाऊ गायकवाड यांनी अशाच जनता दरबाराचे आयोजन केले होते त्याप्रसंगी त्यांनी सर्वसामान्यांचे अनेक समस्या सोडवल्या होत्या, त्यांचा सुद्धा त्यांनी आढावा घेतला. एकीकडे पावसाने थैमान घातले असून शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे तर दुसरीकडे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे अनेक विकास कामे मार्गी लावायची आहेत, त्यामुळे वेळ कमी आहे परंतु आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत ताबडतोब जनता दरबाराचे आयोजन करून शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावल्या याबद्दल सर्वच शेतकरी बांधवांनी त्यांचे आभार मानले आहेत, यावेळी त्या ठिकाणी धर्मवीर युथ फाऊंडेशनचे संस्थापक पृथ्वीराज भाऊ गायकवाड यांच्यासह महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.