मोताळा : बेलदार समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या भारतातील एकमेव बेलदार समाजाचे देवस्थान मोताळा तालुक्याच्या पान्हेरा येथीलआदिशक्ती कानु सती माता यांच्या देवस्थानाला आमदार संजय गायकवाड यांचे प्रयत्नाने ‘ब’ दर्जा प्राप्त— समाजासहित हिंदू धर्मांमध्ये उत्साहाचे वातावरण बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी मतदार संघामध्ये विकासाचे नवीन पर्व सुरू केले असून सर्व धर्मियांना समानतेची वागणूक देत नवीन इतिहास या मतदारसंघांमध्ये निर्माण केला आहे, बुलढाणा जिल्ह्यामधील मोताळा तालुक्यामध्ये पान्हेरा येथे संपूर्ण हिंदुस्थान मध्ये एकमेव असे आदिशक्ती कानु सती मातेचे मंदिर असून हे बेलदार समाजासहित सर्व हिंदू धर्माचे सुद्धा श्रद्धास्थान आहे, लाखो भाविक या ठिकाणी दरवर्षी आदिशक्ती कानू सती मातेच्या दर्शनाला येतात, फार मोठा यात्रा महोत्सव सुद्धा साजरा केला जातो. या परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने आमदार संजय गायकवाड यांनी सातत्याने या मंदिराला विकास निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा घेतला, मंत्री महोदयाच्या दालनात बैठका घेतल्या असुन देवस्थान परीसर सौंदरिकरण व बांधकाम करिता लवकरच 2 कोटी रूपयांचा भरिव निधि मंजूर होणार आहे,तहा निधी मंजूर करताना या तीर्थक्षेत्राला ब वर्गाचा सुद्धा दर्जा देण्याचे शासन निर्णय आलेले आहेत, त्यामुळे भविष्यात सुद्धा या तीर्थक्षेत्राचा जोमाने विकास व्हायला सुरुवात होईल, आमदार संजय गायकवाड यांनी मतदारसंघांमध्ये विविध विकास कामे करत असतानाच विविध महापुरुषांचे पुतळे, हिंदू धर्मीयांसाठी सभा मंडपे, बौद्ध बांधवांना बौद्ध विहार, मुस्लिम बांधवांना शादी खाने सहित सर्व धर्मांना समान दर्जा देत सर्वांचा सर्वांगीण विकास करीत समतेचा संदेश दिलाआहे. तसेच अशाप्रकारे नारीशक्तीचां गौरव करुन सर्व सामान्य वर्गाकडून विशेषतः महीला वर्गाकडून येत आहे..