बुलढाणा :भारतातील सगळ्यात मोठी पत्रकारांची संघटना तथा 46 देशांमध्ये आपले जाळे पसविणारी संघटना म्हणून ख्यातनाम असलेल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बुलढाण्याचे सुपुत्र अनिल मस्के यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे. त्यांनी आज मुंबई येथे आयोजित सोहळ्यात आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. त्यांचा सत्कार आणि पदग्रहण सोहळा आज मुंबई येथे पार पडला. व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे यांनी अनिल मस्के यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली.
दोन वर्षांपूर्वी व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या देशीव्यापी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी अनिल मस्के यांची नियुक्ती झालेली होती. त्यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी राज्यभरात पत्रकारांसाठी विविध योजना राबविल्या. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदासह राज्य कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष पदासाठी राज्यातून सर्वाधिक प्रथम पसंतीचे मतदान अनिल मस्के यांना मिळाले आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवडणुकीतून निवड झाली. विजय झालेले नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष व राज्य कार्यकारणीतील इतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार व पदग्रहण सोहळा आज 29 सप्टेंबर रोजी मुंबई येथील मुंबई प्रेस क्लबच्या सभागृहातपार पडला. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी तथा मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, देशोन्नतीचे संस्थापक संपादक प्रकाश पॊहरे, राजश्रीताई हेमंत पाटील व विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते अनिल मस्के यांचा सत्कार करून त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार सोपविण्यात आला. राज्यभरातील पत्रकारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. अध्यक्ष पदाची दिलेली जबाबदारी मी निष्ठेने पार पाडण्याचा शब्द देतो असे सांगत पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात प्रतिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी आणि मस्के यांनी सत्काराला उत्तर देताना दिली. राज्य कार्यकारिणीमध्ये विजय झालेला इतर पधिकारांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.