कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

SHARE

बुलडाणा, दि. 05 : राज्य शासनाच्या कृषि विभागातर्फे विविध कृषि पुरस्कार देण्यात येतात. सन 2023 यावर्षीच्या कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कृषि विभागातर्फे राज्यात कृषि आणि संलग्न क्षेत्र, तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे, कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरीता योगदान देणारे शेतकरी यांचा, तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट यांना  डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, सेंद्रीय शेती कृषिभूषण, उद्यानपंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, युवा शेतकरी पुरस्कार व कृषि विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

सन 2023 या वर्षामध्ये कृषि आणि संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती, गट, संस्थांकडून विविध कृषि पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यात शेतकरी, गट, संस्था, व्यक्ती यांना कृषि पुरस्काराचे प्रस्तावकामी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृ‍षि सहायकाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.


SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button