मोताळा : मोताळा न पं चे मुख्याधिकारी हे प्रभारी असल्यामुळे .त्यांच्या अनुपस्थीती मध्ये अनेक प्रशासकीय कामामध्ये अडथडा येत असुन इतर अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे शहरातील नागरीकांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे . अनेक नागरिकांनी मोताळा नगर पंचायत मध्ये समस्त घेऊन जातात मात्र नागरिकाच्या समस्या ऐकायला वाली नसून मोताळा नगर पंचायत चा कारभार अधिकारी याच्या मनमानी सुरु असून त्याबाबत आज मोताळा तालुका कांग्रेस कमिटी चे तालुकाध्यक्ष गजानन मामलकर यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत असून . मागील दोन वर्षाअगोदर मोताळा शहरात १३० घरकुलांची यादी मंजुर होउन आज २ वर्षात फक्त २० घरकुलाचे काम सुरु असुन. याच घरकुलाचे काम पूर्ण होवून सुद्धा अद्याप या पूर्ण झालेल्या घरकुलाच्या लाभार्थाना कुठलेच अनुदान मिळाले नाही व अधीकारी यांच्या मनमानी कारभारामुळे ११० घरकुलाचा निधी परत जाण्याच्या मार्गावर असुन ऐन पावसाळ्यात ८ दिवसाच्या आत घरकुलाचे काम सुरु करण्याचा फर्मान काढण्यात आला वार्ड क्र १४ मध्ये अंतर्गत गटारीचे काम अपूर्ण असतांना सबंधीत ठेकेदाराला अर्थव्यव्हार करून पूर्ण बिल दिले सध्या पावसाळ्याचे दिवस असतांना . शहरातील साफसफाई व आरोग्या विषय कुठलेही नियोजन नाही शहरात होणारा दुषित पाणीपुरवठा मोताळा शहरातील मुख्य प्रवेशव्दार (वेस ) यामध्ये कित्येक वर्षापासुन साचणारे नालीचे पाणी यासंदर्भात मुख्याधिकारी जे ६ महीन्या पासुन न पं कार्यालयात आले नाहीत त्यांना बरेच फोन करूनही उत्तर न देणे या संदर्भात आज नगर पंचायत कार्यालयात उपस्थीत बांधकाम इंजिनिअर एकडे यांना विचारणा केली असता त्यांची अरेरावी व उडवाउडवीच्या उत्तराने शहरातील नागरीकांच्या समस्यांच्या विरोधात गजानन मामलकर आज चांगलेच आक्रमक झाले होते . वरील विषयावर तात्काळ कार्यवाही न झाल्यास मग वेगळ्या पद्धतीने काम कसे करून घ्यायचे हे माहीत असल्याचे पण त्यांनी सांगीतले. तसेच मोताळा शहरातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी स्थायी मुख्याधिकारी देण्याची मागणी जिल्हाधीकारी यांच्या कडे करणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगीतले यावेळेस नगरसेवक ,रवि पाटील संदिप वानखेडे, विष्णु शिराळ, यांच्यासह मोताळा शहरातील नागरीक सुद्धा उपस्थीत होते….