मोताळा : महाराष्ट्र भर गाजलेल्या राजूर घाटातील विवाहितेवरील तथाकथीत सामूहिक बलात्कार प्रकरणाला पिडित विवाहितेने स्वत: पोलीसांना दिलेल्या जवाबामुळे अचानक वेगळे वळण आले असून हे प्रकरण आता ‘छेडखानी’ आणि ‘लूटमारी’चा प्रकार निघाला आहे. पिडीतेने स्वतः येवून तिच्यासोबत कुठल्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे सांगितल्यानंतर सर्वत्र पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दरम्यान हायप्रोफाईल झालेल्या या प्रकरणात पोलिसांनी 8 आरोपींपैकी 7 आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. उर्वरीत एक आरोपी अजून फरार आहे. विशेष म्हणजे पकडण्यात आलेल्या 7 आरोपींपैकी दोन आरोपी विधीसंघर्ष बालक अर्थात 18 वर्षाच्या आत असल्यामुळे त्यांची रवानगी शासकीय बाल निरीक्षक गृहामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल रमेश राठोड वय 25 रा. मोहेगांव, मंगेश मल्हारी मोरे वय 23, विजय उर्फ दयन्या मधुकर बरडे वय 19 वर्षे रा. डोंगरखंडाळा, किसन उर्फ श्रीराम बरडे वय 21 रा. डोंगरखंडाळा यांचा समावेश आहे. इतर दोघे 18 वर्षापेक्षा कमी असल्यामुळे त्यांची नावे देता येणार नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार यापैकी राहुल राठोड आणि मंगेश मोरे या आरोपींना फत्तेपुरहुन धामणगाव बढे येत असतांना स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा पथकाने पकडले तर राठोडला त्याच्या घरूनच पकडण्यात आले आणि इतर चार जण तारापूरच्या जंगलाकडे लपत-छपत जात असतांना पोलिसांना मिळून आले.