चंद्रपूर – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे एस. टी. वर्कशॉप येथे १३ जुलै व नगिनाबाग येथील सेंट मायकल शाळा येथे १४ जुलै रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी आयुक्त विपीन पालीवाल,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपअभियंता रविंद्र हजारे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
याप्रसंगी आयुक्त विपीन पालीवाल यांनी विद्यार्थ्यांना झाडाचे महत्व समजावुन सांगितले, झाडे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तींना रोखतात, आपल्या शहरात
मोठया प्रमाणात प्रदूषण,उष्णता असते यावर मात करण्यास वृक्षारोपणाची आवश्यकता आहे. आज सेंट मायकल शाळा येथे वृक्षारोपण करण्यात आलेल्या वृक्षांचे जतन व संवर्धन शिक्षकांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी करावे. प्रत्येक विद्यार्थ्याने जर एका वृक्षाची जबाबदारी घेतली तर शाळेचा परिसर वृक्षमय होईल.
सेंट मायकल शाळेतील कार्यक्रमात मुख्याध्यापिका प्रणाली कोल्हेकर, माजी नगरसेविका छबुताई वैरागडे, शिक्षक वर्ग व सर्व विद्यार्थी – विद्यार्थीनी यांची उपस्थिती होती तर एस. टी. वर्कशॉप येथील वृक्षारोपण कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,राज्य परिवहन महामंडळचे अधिकारी बिराजदार ,चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे सदस्य उपस्थीत होते.