राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष यशवंत धाबे यांनी केला आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश-

SHARE

मोताळा : राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष यशवंत धाबे यांनी केला आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश—- आमदार संजय गायकवाड यांनी केला त्यांचा सत्कार ता मोताळा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा पंचायत समितीचे माजी सभापती यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये 15” जुलै रोजी आपल्या शेकडो समर्थकांसह प्रवेश घेतला बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विकास कार्यामुळे प्रभावित होऊन अनेक पक्षातील दिग्गज नेते शिवसेनेमध्ये प्रवेश करीत असून मोताळा पंचायत समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष यशवंत धाबे यांनी शिवसेनेमध्ये अधिकृतरित्या प्रवेश घेतला, त्यांचे आणि त्यांच्यासोबत आलेल्या शेकडो समर्थकांचे आमदार संजय गायकवाड यांनी शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत केले. मोताळा पंचायत समितीच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमांमध्ये आमदार संजय गायकवाड यांनी मतदार संघामधील विकास कामांसोबतच सध्या राज्यामध्ये चालू असलेल्या राजकारणाबाबत सुद्धा विस्तृत मार्गदर्शन केले. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यामुळे आधीच बळकट असलेले हे सरकार आता अधिक गतिमान झाले आहे, तिन्ही पक्षामध्ये कुठलेच मतभेद नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे काम करणारे नेते असल्यामुळे विकासाची गती वाढेल असा सुद्धा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतदार संघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे याकरिता दळणवळणाच्या सुविधा, सिंचनाची सुविधा, विजेची सुविधा, शिक्षणाची सुविधा, युवकांना रोजगाराच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण कटिबद्ध असून लवकरच बुलढाणा येथे कृषी विद्यालय, मेडिकल कॉलेज, सीबीएससी पॅटर्नच्या शाळा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यामधील मुख्य ठिकाणी लवकरच सीबीएससी पॅटर्नच्या शाळा आपण सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले . तालुक्यामधील सिंचनाच्या सुविधांमध्ये वाढ व्हावी यासाठी बोदवड उपसा सिंचन योजना. पलढ ग चे पाणी इतर धरणामध्ये वळवणे, हारमोड धरणाची उंची वाढवणे, मूर्ती येथे धरण बांधकाम, अनेक गावांमध्ये बंधारे बांधण्याचा महत्त्वाचा प्रकल्प आपण हाती घेतलेला असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. आमदार संजय गायकवाड यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या कार्य शैलीने प्रभावित होऊन या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपण शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी ईश्वर चव्हाण, सौरभ सिंग येर वाल, प्रवीण जाधव, शरदचंद्र पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख ओम सिंग राजपूत यांची सुद्धा समचित भाषणे झाली, यावेळी अनिल राऊत, शेषराव भोंगे, चेतन राऊत, जनार्दन इंगळे, छगन धाबे, शंकर नारखेडे, मोहसीन शहा, मुनवीर खान मुशीर खान, राजेंद्र बिचकुले, प्रकाश इंगळे, दिलीप किनगे, राजेंद्र वराडे, सदाशिव येर वाल, हरिश्चंद्र चव्हाण, युवराज धाबे, अनिल देवकर शिवा चव्हाण, गोदावरी बाई चव्हाण, गंगुबाई जाधव, गिताबाई राठोड अंजनाबाई राठोड, भिका राठोड, नितीन येर वाल, प्रशांत राठोड, प्रकाश जाधव, दयाराम जाधव, संतोष धुरंदर, शेख नासिर शेख बशीर, बशीरशहा गफूर शहा, शेख कलीम शेख बब्बू, शिवाजी मेरठ कर, अनिल, मेरठ कर, शेख तसलीम शेख जलील फिरोज खान यासीन खा, शेख जावेद शेख सलीम, यांनी शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश घेतला


SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button