मोताळा : मोताळा तालुक्यातील 2628 लोकवस्ती असलेल्या तालखेड गावात 2020 पासून अटल भूजल योजनेचे आगमन झाले, आणि गावाने एक वेगळीच दिशा घेतली, पूर्वी पारंपरिक पद्धतीने दांडाच्या सहाय्याने सर्वच शेतकरी पिकांना पाणी देत होते यामुळे पाण्याचा अपव्यय जास्त प्रमाणात होत होता, जमिनीतून पाणी पातळी दिवसंदिवस खोलावत जात होती आणि पाण्याचा अपव्यय झाल्यामुळे कमी क्षेत्रात पीक घ्यावे लागत होते, अटल भूजल योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सूक्ष्म सिंचनाचा वापर होऊ लागला यामुळे पाणी बचत होऊन कमी पाण्यात जास्त क्षेत्र ओलिताखाली आले. पाणी ही काळाची गरज असून गावात योजनेच्या माध्यमातून दरवर्षी पाण्याचा ताळेबंद मांडल्या जात आहे. त्यामध्ये गावात पावसाचे पडणारे पाणी, गावात उपलब्ध पाणी, आणि गावात लागणारे पिण्यासाठी, पशुधनासाठी व शेतातील पिकांसाठी लागणारे पाणी यांचे एकंदर नियोजन करण्यात येते. त्यासाठी उपाय योजना म्हणून ग्रामसभेने कमी पाणी लागणाऱ्या पिकांचा अवलंब करावा, खोल विंधन विहिरीतून सिंचन बंदी, खोल विंधन विहिरी खोदण्यास बंदी यासाठी ठराव घेतले आहे, तसेच अटल भूजल योजने अंतर्गत नाल्यामध्ये आर्टिफिशियल रिचार्ज शॉप्ट, ग्रामपंचायत अंतर्गत गावातील नाले खोलीकरण, तलावातील गाळ काढणे, सार्वजनिक व वैयक्तिक शोषखड्डे, वृक्ष लागवड, छतावरील पाणी संकलन, विहीर पुनर्भरण, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व मलचिंग चा जास्तीत जास्त वापर यासारख्या उपाययोजना करत आहेत. याकरिता तालखेड गावाचे युवा सरपंच श्री. मारोती कोल्हे, उपसरपंच श्री. मोहन सपकाळ, ग्रामसेवक श्री पडोळ साहेब, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गणेश चोपडे, छाया प्र चोपडे, गौकर्णाबाई आ अत्तरकर, जितेंद्र कोल्हे, पुष्पा गो दोडे, माधुरी प्र चोपडे, सुनीता द दसरथे, प्रतिभा प्र दोडे, सुपडा खाकरे,राहुल ग गारमोडे, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी विष्णू बोंदले , निलेश परमार आणि गावातील सर्व ग्रामस्थ, महिला व तरुण युवक उस्फुर्त सहभाग घेऊन काम करीत आहे यासाठी वरीष्ठ भूवैज्ञानिक कार्यलय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा बुलडाणा व श्री. गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था उंबरखेड, देऊळगाव राजा, अंतर्गत माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ शिवशंकर गव्हाळे व समूह संघटक शिवाजी मानकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते.