मोताळा : बुलढाणा जिल्ह्यातील बोरांखेडी पोलीस स्टेशन येथे हल्ली कार्यरत आसलेले ठाणेदार श्री बळीराम गिते हे सन 2014 मद्ये करमाड जिल्हा औरंगाबाद ग्रामीन येथे ठाणेदार म्हणून नेमणुकीस आसताना, त्यांच्या करमाड पोलीस स्टेशन हद्दीत, एका आरोपिताने एका अल्पयीन मुलीवर सन 2014 साली बलात्कार केला होता.त्या अनुषंगाने सदर पोलीस स्टेशन ला IPC u/s 376,341 व pocso Act u/s 4,6,8 ,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सादर गुन्ह्यात आरोपीला तात्काळ अटक करून, सदर गुन्ह्याचा वेळेत तपास करून, आरोपी विरुद्ध मा. न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले होते.सदर प्रकरणात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद एकूण सदर गुन्ह्यात मा.विशेष सत्र न्यायाधीश औरंगाबाद ,यांनी दिनांक 12/6/23 रोजी सदर गुन्ह्यातील आरोपितास पुढील प्रमाणे शिक्षा सुनावली आहे..
1) भा.द. वि.कलम376 मध्ये 10 वर्ष शिक्षा व 20000रूपये दंड.
2) भा.द.वी.कलम 341 मध्ये 3 महिने शिक्षा व 500 रुपये दंड.
3) POCSO Act u/s 4 मध्ये 20 वर्ष शिक्षा व 20000 रुपये दंड.
4) POCSO Act u/s 6 मध्ये 20 वर्ष व शिक्षा 25000 रुपये दंड.
5) POCSO Act u/s 8 मध्ये 03 वर्ष शिक्षा व 500 रुपये दंड.
आशा प्रकारे वरील नमूद गुन्ह्यात आरोपी नामे नारायण सुपडसिंग मंदावत यास सदर प्रकरणात मा. न्यायालय, औरंगाबाद यांनी कडक शिक्षा व 70500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
श्री गिते यांच्या या उत्कृष्ट तपासाबाबत यांचा काल दिनांक 14/6/२३ रोजी औरंगाबाद येथे “प्रशांसापत्र” देऊन मा. विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र, औरंगाबाद डॉ. श्री ज्ञानेश्वर चव्हाण सर यांचे शुभहस्ते व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे प्रमुख उपस्थित गौरव करण्यात आला आहे.
श्री गिते यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल मा.पोलीस अधीक्षक बुलडाणा श्री सुनील कडासने साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री महामुनी साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री वाघ साहेब तसेच बोराखेडी पोलीस स्टेशन मधील दुय्यम अधिकारी व पोलीस अमालदार यांनी यांचे अभिनंदन केले आहे….