कृषी विभागाकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आठ किलो सोयाबीनचे वाटप
मोताळा – कृषी विभागाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आठ किलो सोयाबीनपेरणी करता वाटप केले असून एक प्रकारे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
या संपूर्ण प्रकारानंतर मोताळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन मामलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोताळा येथील कृषी विभाग गाठून तालुका कृषी अधिकारी यांची भेट घेतली. व कृषी अधिकारी अंगाईत यांना जाब विचारला असता त्यांनी सांगितले की अशा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना प्रायोगिक तत्त्वावर आठ किलो सोयाबीन कृषी विभागामार्फत वाटप करण्यात आल्याचे सांगितले म्हणजे अजित आत्महत्या केलेल्या घरचा पुरुष गेला असता त्यांना आठ किलो सोयाबीन प्रायोगिक तत्त्वावर देऊन अशा कुटुंब यांचे थट्टा करण्याचा घाट महाराष्ट्र शासनाने सुरू केला असून यावेळेस आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना हेक्टरी 75 किलो सोयाबीन देण्याची मागणी यावेळेस मोताळा तालुका काँग्रेसकडून करण्यात आली. तसेच पोखरा योजना बंद करण्याचा घाट सुद्धा कृषी विभागामार्फत सुरू असून शेतकऱ्यांचे पोखरा योजनेतील उर्वरित थकित असलेले पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे ही मागणी सुद्धा यावेळेस करण्यात आली. यावेळी मोताळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन मामलकर,सरपंच श्रीकृष्ण खराटे,सरपंच बाबुराव खंडेराव,विष्णू शिराळ,विकास बस्सी,दिनेश घोती यांच्यासह इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.