राज्यात दलितांवरील वाढत्या घटनेचा निषेधार्थ मोर्चा
मोताळा :- राज्यात दलित अत्याचाराच्या, खुनाच्या व बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्या घटनांचा निषेध नोंदविण्यासाठी आज बुधवार दिनांक १४ जून २०२३ रोजी ‘जनआक्रोश’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदर जनआक्रोश मोर्चाला दुपारी 12 वाजता शहरातील आठवडी बाजार येथून सुरुवात करण्यात आली. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव व महिलांची मोठी उपस्थिती होती. यावेळी बोंडार जि.नांदेड येथे अक्षय भालेराव या तरुणाचा भिमजयंती साजरी केल्याचा राग मनात धरुन त्याची निर्घृणपणे हत्या केल्याचा निषेध नोंदवून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे. की, बोंडार जि. नांदेड येथे अक्षय भालेराव या तरुणाचा भिमजयंती साजरी केल्याचा राग मनात धरून समाजकंटका कडून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली, भोसा येथील बौद्ध तरुण शरद बेडे यांचा शेतीच्या वादातून खून करण्यात आला., मुंबई येथील सावित्रीबाई फुले मुलींचे वस्तीगृहामध्ये बौद्ध तरुणीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला, चिंचोली बुरुकुल ता. देऊळगाव राजा जि. बुलढाणा येथील बौद्ध अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. आणि या प्रकरणातील आरोपीला पाठीशी घालणारे डी.वाय.एस.पी. यामावर. सिंदखेडराजा पी.एस.आय. सानप, ठाणेदार केशव वाघ या जातीवादी अधिकाऱ्यानां तात्काळ निलंबित करून सह आरोपी करावे, अशा सर्व घटनेची सी.बी.आय. चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अन्यायग्रस्त कुटुंबांना शासनाने तात्काळ रु.५० लाख रुपये रोख देण्यात यावे, पिडीत कुटुंबातील व्यक्तींना शासकीय सेवेत रुजू करण्यात यावे, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी निवेदनातुन प्रशासना कडे करण्यात आली ..