पर्यटन मंत्री ना.मंगलप्रभात लोढा यांचे मा.आमदार विजयराज शिंदे यांनी व्यक्त केले आभार
बुलडाणा/ मोताळा:-बेलदार समाजासह असंख्य भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या मोताळा तालुक्यातील पान्हेरा गावात असलेल्या श्री क्षेत्र कान्हू सतीमाता संस्थानच्या विविध विकास कामांसाठी भाजपा नेते मा.आमदार विजयराज शिंदे यांच्या मागणी व पाठपुराव्या नुसार पर्यटन मंत्री ना.मंगलप्रभात लोढा यांनी सण 2023-24 या चालू आर्थिक वर्षासाठी 1 कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून त्यास प्रशासकीय मान्यता सुद्धा प्रदान केली आहे.
पान्हेरा येथील श्री क्षेत्र सतिमाता संस्थान हे अखिल भारतातील बेलदार समाजाचे मोठे श्रध्दास्थान असून दरवर्षी लाखो भाविक भक्त याठिकाणी येत असतात,फक्त बेलदार समाजच नव्हे तर इतर समाजातील भाविक भक्त सतीमातेला मानतात व याठिकाणी मनोभावे येऊन पूजाअर्चा करत असतात.
मा.आमदार विजयराज शिंदे यांनी आपल्या आमदार असतांना च्या कार्यकाळात श्रीक्षेत्र सतिमाता संस्थान ला “क” तिर्थ क्षेत्राचा दर्जा व इतर अनेक योजनांच्या माध्यमातून सभामंडप, सभागृह,पाण्याची टाकी, भक्त निवास यांसह अनेक विकास कामे करून तीर्थक्षेत्राचा विकास केलेला आहे.
सदर तीर्थक्षेत्राला येणाऱ्या भाविकांची दिवसेंदिवस येणारी संख्या लक्षात घेऊन अनेक विकास कामे करणे गरजेचे आहे ही मागणी संस्थान चे अध्यक्ष व विश्वस्थानी मा.आमदार विजयराज शिंदे यांच्या कडे केली होती. त्यानुसार विजयराज शिंदे यांनी पर्यटन मंत्री मा.ना.मंगलप्रभात लोढा
यांना दि. 28.3.2023 रोजी लेखी पत्र देऊन संस्थान च्या विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणी वर मंत्री ना.मंगलप्रभात लोढा यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते व त्याचा विजयराज शिंदे यांनी सतत पाठपुरावा सुदधा केला.
त्याचेच फलित म्हणून ना.मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या खात्याच्या पर्यटन विकास योजने अंतर्गत चालू आर्थिक वर्षात 1 कोटी रुपयांचा भरघोस निधी 1 जून 2023 च्या शासन निर्णयाने शासन निर्णय मंजूर केला आहे.
(शासन निर्णय क्रमांक : बैठक/2022/07/प्र.क.195/पर्यटन) तसेच या निर्णयात जिल्हाधिकारी बुलडाना यांना 30 लाख रुपये खर्चाची मान्यता सुद्धा प्रदान केली आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र सतिमाता संस्थान तिर्थक्षेत्राचे स्वरूप लवकरच पालटणार असून येणाऱ्या भाविक भक्तांच्या सोयीसाठी विविध विकास कामे होणार आहे.
मा.आमदार विजयराज शिंदे यांनी आमदार नसतांना सुद्धा मतदार संघातील विविध प्रश्न ,विकास कामे मार्गी लावण्याचे कसब व प्रशासना वरील पकड या रूपाने परत एकदा दिसून आली आहे.
1 कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल श्रीक्षेत्र सतिमाता संस्थानचे अध्यक्ष व विश्वास्थांच्या वतीने आभार व्यक्त केले आहे. तसेच मा.आमदार विजयराज शिंदे यांनी देखील पर्यटन मंत्री मा.ना.मंगलप्रभात लोढा यांचे विशेष आभार मानले आहे.