बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना युवासेनेच्या शाखा उद्घाटन

SHARE

मोताळा : दिनांक- ०६ जुलै २०२४ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यामध्ये ग्राम.खडकी, खामखेड, गुळभेली,राहेरा दाभा,नाईकनगर,नळकुंड,उबाळखेड,रोहिणखेड,टाकळी,वाघजाळ,वारुळी,नेहरूनगर,राजुर,मोहे गाव, खैरखेड,या गावामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना,युवासेना,किसान सेना,महिला आघाडी,अल्पसंख्यांक सेनेच्या शाखा उद्घाटनाची धडाकेबाज सुरुवात करण्यात आली, यावेळी प्रत्येक गावामध्ये धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचे जल्लोषांमध्ये स्वागत करण्यात आले, ठिकठिकाणी माता-भगिनींनी धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड यांचे औक्षण करून स्वागत केले, यावेळी प्रत्येक गावामध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने आपली उपस्थिती दाखवली तसेच येणाऱ्या काळामध्ये आमदार संजय गायकवाड यांना गावाच्या वतीने खंबीर साथ देऊ असे गावकऱ्यांनी सांगितले…!
यावेळी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्यासह शिवसेना युवासेना किसान सेना महिला आघाडी अल्पसंख्यांक सेनाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी शिवसैनिक तसेच प्रत्येक गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते…!


SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button