रविकांत तुपकर उद्या ठरविणार पुढील राजकीय भूमिका

SHARE

बुलढाण्यात शनिवारी ०६ जुलैला तुपकरांनी बोलावली समर्थकांची महत्वाची बैठक……

बुलडाणा (ता.०५ प्रतिनिधी): शेतकरी, शेतमजूर, युवक व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी लढणारा फायर ब्रँड नेता म्हणून राज्यभर प्रसिद्ध असलेले रविकांत तुपकर शनिवारी, ०६ जुलै रोजी आपली पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. यासाठीच जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. बुलढाणा शहरातील चिखली रोडवर असलेल्या गोलांडे लॉन्स येथे ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच बैठक आहे. लोकसभा निवडणुकीनंतर रविकांत तुपकर आपल्या कार्यकर्त्यांशी प्रथमच जाहीरपणे संवाद साधणार आहेत. त्यामुळे ते नेमके काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे शिवाय या बैठकीत रविकांत तुपकर कोणती राजकीय भूमिका जाहीर करतात याकडे देखील जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे देखील लक्ष लागून आहे.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून रविकांत तुपकर यांनी एकट्याच्या बळावर तब्बल अडीच लाख मते घेत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. मेहकर, सिंदखेडराजा चिखली आणि बुलढाणा या घाटावरच्या चार विधानसभा मतदारसंघाच्या बेरजेत ते पहिल्या क्रमांकावर होते मात्र घाटाखालील जळगाव जामोद आणि खामगाव या दोन मतदारसंघातून त्यांना अपेक्षित मते न मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. पण असे असले तरी विजयी उमेदवारापेक्षा यांच्या पराभवाचीच चर्चा सर्वत्र आहे.त्यामुळे तुपकर यांची भविष्यातील राजकारणाची दिशा काय राहील याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. त्यामुळे शनिवारी होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. रविकांत तुपकर हे त्यांची पुढील राजकीय भूमिका या बैठकीत स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागून आहे.


SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button