किनगाव राजा : आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे. बदलत्या काळासोबत तंत्रज्ञानाची कास धरणे गरजेचे आहे. राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत आहेत. कर्मचारी वर्ग प्रशिक्षित आहे. सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने होतात. आधुनिक तंत्रज्ञान ही राजर्षी शाहू पतसंस्थेची ओळख आहे, असे प्रतिपादन अभिता कंपनीचे संस्थापक आणि सीईओ तथा माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके यांनी केले. येथील राजर्षी शाहू ग्रामीण पतसंस्थेच्या शाखेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी ठेवीदारांचा सत्कार करण्यात आला. तसेच क्यूआर कोडचे वाटप करण्यात आले. पुढे बोलतांना सुनील शेळके म्हणाले, ठेवीदार, खातेदार, ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्था कटिबद्ध आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. भविष्यात यापेक्षा दर्जेदार सुविधा देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष गणेशराव रिंढे, संचालक राजेंद्र सुसर, तसेच अरुण टापरे, रमेश पालवे, लक्ष्मणराव वाघ, पोलीस पाटील वसंतराव उगले, गजानन सिढोतकर, गोविंद टोके, प्रदीप घिके, सतिष वायाळ, विजय उगले, श्री. शेवाळे, नारायण बोडखे, माजी सरपंच दिगंबर वायाळ, अशोक निलख, प्रल्हाद काकड, श्रीराम वायाळ, अनिल पाटील, दिगंबर हुसे, नगरसेवक राजेंद्र आढाव, तानाजी भोबळे, अनिरुद्ध वायाळ, पंढरीनाथ जायभाये, माजी सरपंच शिवशंकर वायाळ, सरपंच ज्ञानेश्वर कायंदे, मंगेश सानप, शरद चाटे, उत्तम पंडित, समाधान वायाळ, विठ्ठल भानुसे यांची उपस्थिती होती.