बुलडाणा, दि. 04 : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
इतर मागासप्रवर्ग, विमुक्त-जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मागासवर्गीय मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा मोफत पुरविण्यात येतात. सन 2024-25 या वर्षाकरीता विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयचा असल्यास विद्यार्थ्यांना दि. 21 जुलै 2024 पर्यंत जिल्ह्यातील स्थानिक वसतिगृहामध्ये उच्च शिक्षण अभ्यासक्रम प्रवेशाकरीता प्रवेश अर्ज सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, बुलडाणा येथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहे.
शासकीय वसतिगृहाचे सन 2024-25साठी प्रवेशाचे वेळापत्रक ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयचा कालावधी दि. 1 ते दि. 21 जुलै 2024 पर्यंत राहणार आहे. पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार दि. 30 जुलै 2024 रोजी अंतिम आणि प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत दि. 10 ऑगस्ट 2024 आहे. दि. 16 ऑगस्ट 2024 रोजी रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.
संबधित विभागीय स्तरावरील वसतिगृहात प्रवेशाबाबत इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्जासोबत आवश्यक कागपदपत्रासह सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, बुलडाणा येथे सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक मनोज मेरत यांनी केले आहे.